Friday, April 12, 2024
Homeवर्धाहिंगणघाट रेल्वे स्थानकावरील रेल्वे थांबा पूर्वरत सुरू करा

हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील रेल्वे थांबा पूर्वरत सुरू करा

‘मनसे’चे उपविभागीय अधिकारी मार्फत रेल्वे मंत्री याना निवेदन

हिंगणघाट :- कोरोना काळापासून हिंगणघाट येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्याचे थांबे रद्द केल्याने हिंगणघाट-समुद्रपूर तालुक्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याकरिता मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्फत रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदनातून केली मागणी.


हिंगणघाट शहर हे तालुक्याचे ठिकाण असून इथे मोठी बाजार पेठ आहे.
अनेक टेक्सटाईल्स पार्क,सगुणा उद्योग समूह,मोहता उद्योग,कापड गिरणी,समूहासारखे महत्वाचे उधोग आहे. नामांतर कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट-समुद्रपूर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नौकाऱ्यासाठी अमरावती, पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई ला ये-जा करतात तसेच विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट शहरातच आहे. हिंगणघाट शहर हे वर्धा शहरापेक्षा ही मोठे असून इथे थांबा नाही व पुलगाव व वरोरा हे शहरे लहान असून सुद्धा येथे रेल्वे गाड्याचे थांबे पूर्वरत सुरू केले मग हिंगणघाट शहरात का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील जनतेसाठी रेल्वे स्थानकावरील थांबणाऱ्या सर्व गाड्याचे थांबे तात्काळ पूर्वरत सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.
या वेळी मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले, जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हासचिव सुनील भुते, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, जगदीश वांदिले, मारोती महाकाळकर, उमेश नेवारे, महिला सेना जिल्हाध्यक्ष निताताई गजभे,शहर संघटक सीमा तिवारी,तालुका उपाध्यक्ष महिला सेना सविता भजभूजे, तालुका संघटक महिला सेना भारती घुंगरूड, शहर अध्यक्ष शीतल गेडाम, शहर अध्यक्ष राजू सिन्हा, शेखर ठाकरे, परम बावणे, किशोर भजभूजे,किशोर पांडे, राजू खडसे,पंकज भट,पप्पू आष्टीकर,गोपाळ कांबळे,अनिल भुते, अरविंद ठाकरे, सचिन भडे, प्रशांत येकोंकर, नितीन भुते, शंकर धुरत, विठ्ठल तळवेकर, नंदकिशोर ढाले पदाधिकारी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular