Saturday, July 27, 2024
Homeवर्धास्व डॉ. अनिल चोरे स्मृती सालोड (हि) येथील आरोग्य शिबिरात 368 रुग्णांनी...

स्व डॉ. अनिल चोरे स्मृती सालोड (हि) येथील आरोग्य शिबिरात 368 रुग्णांनी घेतला लाभ!

वर्धा :

स्व. डॉ. अनिल चोरे यांनी गावातील गोर गरीब जनतेचा आरोग्याचा दयास ठेवत गावामध्ये 40 वर्ष अविरत सेवा दिली, अत्यल्प दरात गरजूना प्राथमिक आरोग्य सेवा देता आली पाहिजे हा त्यांच्या उद्धेश सदैव होता. परंतु सण 2018 ला त्यांचे निधन झाले. त्यांचाच पाऊलावर चालत त्याची मुलगी डॉ. मयुरी अनिल चोरे हिने आपल्या वडिलांनी सालोड गावामध्ये जी आरोग्य सेवा दिली त्याच कुठेतरी आपणाही देण दिले पाहिजे म्हणून ती 4 फेब्रुवारी ला वडिलांचा जन्मदिनाच्या औचित्यवर सालोड (हि.) येथे वडिलांचा स्मृती निमित्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सद्या ती पश्चिम बंगाल येथील बालुरघाट येथे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या स्मृतीस उजाळा कायम राहो म्हणून ती गावामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहे अशी माहिती उपसरपंच आशिष कुचेवार यांनी दिली. या शिबीर मध्ये गावातील 368 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी कार्यक्रमाकरिता गावचे सरपंच अमोल कन्नाके, ग्रा. प. सदस्य सुरेश ठाकरे ग्राप सदस्य अतुल जुडे, अलका चोरे सुनील चौरे डॉ. प्राजक्ता गुंडतवार, डॉ. डॉ. अभय मोहिते डॉ. शुभम माणिकपुरे, डॉ. भाग्यश्री मोहिते, डॉ. पूजा चांडक डॉ. भूषण टेकाम, डॉ. प्रांजली चौधरी, डॉ. श्रीकांत वतारे, संजीव वाघ, कमलाकर लाडेकर, गजानन लोणकर, रुचित तोटेवार आदी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular