येरला : नजीकच्या वडनेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे” आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुहीक वाचन करून करण्यात आले. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सारिका चौधरी – कॉलेज समन्वयक, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विनोद मुडे, प्रा.डॉ. गणेश बहादे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. आरती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय मेहनतीने व कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संपूर्ण भारतीयांच्या आशा – आकांक्षाचे प्रतिबिंब म्हणजे भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आणि मार्गदर्शक आहेत. असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सारिका चौधरी यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान हे जगातले सर्वात मोठे व विस्तृत लिखीत संविधान आहे. या उलट अमेरिकेचे संविधान हे जगाततले सर्वात लहान लिखीत संविधान आहे. एवढ्या मोठ्या संविधानाचा सार अतिशय मोजक्या शब्दात व सुरेखपणे प्रास्तविकेत मांडल्या गेला आहे. या प्रास्तविकेतील एकूण 84 शब्द हे एकाच वाक्यात मांडले आहेत. या प्रास्तविकेच्या संदर्भात जागतिक किर्तीचे विचारवंत अर्नेस्ट बेकर यांनी जगातली सर्वात सुरेख प्रास्तविका असे म्हटले आहे. या प्रास्तविकेत आमच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप, राज्यव्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला असून याचे श्रेय लोकांना दिले गेले आहे. असे विचार संविधान दिनाचे मार्गदर्शक डॉ. विनोद मुडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ. गणेश बहादे, रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणाले की, भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्वाचा प्रसार करण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो असे विचार व्यक्त केले. आभार प्रा. डॉ. पंकज मुन यांनी मानले. कार्यक्रमाला उपस्थित प्रा. डॉ. प्रवीण कारंजकर, प्रा. डॉ. विट्ठल घिनमिने, डॉ. नरेश भोयर, प्रा. नितेश तेलहांडे, नरेश कातडे, संजय पर्बत, प्रीती कलोडे, सुरेश तेलतूंबडे, अरुण तिमांडे, विजयालक्ष्मी जारोंडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कू. निकीता चौधरी, अनुश्री पाटिल, बबली रुयारकर व साक्षी लोहकरे इत्यादी अनेक विद्यार्थी उपस्थित होते.