सेलू :
सेलू वर्धा मार्गावरील रमना फाटा येथील समृद्धी महामार्गावरील आपकोन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे पुलाचे बांधकाम वर ठेवून असलेल्या लोखंडी आठ सेंट्रींग प्लेट चोरीप्रकरणी सेलू पोलिसांनी पाच आरोपी अटक केली असून गाडी सहित मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोमवारचे मध्यरात्रीच्या सुमारास रमना फाटा येथील आपकोन इम्पोर्टेन्ट लिमिटेड कंपनीचे पुलाचे बांधकाम वर ठेवून असलेल्या लोखंडी आठ सेंट्रींग प्लेट वजन अंदाजे 600 किलो अंदाजे 24 हजार रुपयाचा माल चोरू चोरून नेत असल्याची तक्रार ॲपकनचे विमल कुमार श्री राम प्रकाश तिवारी यांनी दिल्यानंतर सेलू पोलिसांनी गुन्हा नोंद करून तत्काळ आरोपी अनिल लक्ष्मण ठाणेकर वय 29 वर्षे राहणार जोशी नगर सेलू, सुरज भोजराज जी ढोबळे वय 30 वर्ष राहणार घोराड, रितेश तुळशीदास नरतांम वय 32 वर्षे राहणार घोराड, अनिकेत अभय माहूरे वय 24 वर्ष राहणार सेलू, शंकर भीमराव करणाके वय पंचवीस वर्ष राहणार घोराड, ह्या पाच आरोपी सहित आठ लोखंडी सेंट्रींग प्लेट रूपे 24000 किमतीच्या, मालवाहू याटो क्रमांक एम एच 31 डीएस 38 35 किंमत 70000 असा एकूण 94 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सेलू पोलिसांनी पाचही आरोपी विरुद्ध भां, द, वि 379, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे, वरील कारवाई सेलू पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांचे मार्गदर्शनात अखिलेश गव्हाणे, नारायण वरठी, सचिन वाटकर, कपिल मेश्राम, अनील भोरे इत्यादींनी केली,