लाखोंची उलाढाल ठप्प
समुद्रपुर : — (मनीष गांधी) महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात नावाजलेला समुद्रपुरचा बैलबाजार व आठवडी बाजार मागील दिड वर्षापासुन कोरोना महामारीमुळे शासनाने बंद ठेवल्याने आठवडी बाजारात बैला वर लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
बैल बाजार कृषि उत्पन्न बाजार समिति अंतर्गत आठवडी बाजारातच भरत असते. येथे गावरानी, राजस्थानी,मध्यप्रदेश येथील माडी,हरयाणा जातीच्या बैलाची विक्री होतात. या बाजारात 25 बैल मालकाची दावनी असते. त्याच प्रमाणे गाय,म्हसी,बकरी आदि जनावरांचीही मोठ्या प्रमाणात खरीदी विक्री होतात.
या बैल बाजारात कमजोर झालेले बैल दावनी वाल्यांना देवून चांगले बैल पलटून घेवून शेतकरी आपली शेती करतात.

फक्त आठवडी बाजाराच्या दिवसी रविवारी लाखो रुपयाची उलाढाल होत असल्याने व त्याअनुशंगाने किराना,कपड़ा,होटल व चिल्लर व्यवसायी आपले परिवाराचे पालनपोषण चांगल्या प्रकारे करतात. येथील बैल बाजार बंद असल्याने संपूर्ण बाजाराची आर्थिक बाजू कोलमडली असुन पून्हा बैल बाजार भरविन्यासाठी प्रयत्न करने आवश्यक आहे.
एकीकड़े बैल बाजाराची पूर्ण जागा भाजी बाजाराने काबिज केल्याने दावन बांधायला जागाच शिल्लक उरली नाही.नगर पंचायत आणि कृषि उत्पन्न बाजार समिति ने बैलाच्या दावनी, म्हसी,गाय आदि जनावरांच्या खरेदी विक्री बाजारासाठी जागेची व्यवस्था करुण द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.आता ही जर जाग आली नाही तर हा नावाजलेला समुद्रपुरचा बाजार महाराष्ट्राच्या रेकॉर्डवरुण संपल्याशिवाय राहणार नाही याची जिल्हाधिकारी वर्धा यांनी नोंद घ्यावी.अशी शेतकर्यांनी मागणी आहे.