Friday, April 12, 2024
Homeवर्धासततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतातील विहीर खचली

सततच्या होणाऱ्या पावसामुळे शेतातील विहीर खचली

ऐन हंगामात शेतकऱ्यावर आर्थिक संकट

प्रमोद झिले
येरला :-
हिंगणघाट तालुक्यातील हडस्ती येथील शेतकरी संजय मारोती करडीले यांचे शेती तालुक्यातील येरला या शिवारात असून त्या शेतातील सिचन विहीर पावसाचे खचली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

संजय करडिले यांनी विहीर च्या कामासाठी सन 2010 मध्ये बँकचे कर्ज घेऊन शेतात विहीरीचे बांधकाम केले. पण आता सतत 15 दिवसा पासून होणाऱ्या पाऊसाच्या दलदली मुळे विहीर खचली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर परतीचा पाऊस गेल्यावर रबी पिकासाठी विहीरीच्या पाण्याची पिकाना गरज असतात. तर ते पाणी कुठून द्यायचं आणि पिक नाही घेता येणार तर बॅंकचे लोन कसे द्याचे हाच मोठा प्रश्न पडला आहे. अश्या दुष्काळात शेतकऱ्यांचे 80 हजार नुकसान झाले . संजय करडीले यांनी या घटनेची माहिती तलाठी भिगरूट यांनी दिली. महसूल विभाग अधिकाऱ्यांनी मौका पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular