कवडूजी ढेंगरे यांचा संकल्प : गाव तिथे संविधान वाटप
वर्धा : 26नोव्हेंबर 1949रोजी डॉ.बाबासाहेब आंबेकरांनी या देशाला भारतीय राज्यघटना तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली.
या घटनेला आज 72 वर्ष पूर्ण झाल्याने भारतीय लोकशाहीचा वर्धापन दिन सेवाग्राम आदर्श नगर येथे साजरा करण्यात आला.यावेळी गाव तिथे संविधान संकल्प करून संविधानाची प्रत विहार कमिटीला सुपूर्द करण्यात आली.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशत वादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कवडूजी ढेंगरे यांनी भारतीय राज्यघटना ग्रंथ विहार कमेतीचे अध्यक्ष दिनेश ताकसांडे यांना देण्यात आली. गावातील प्रत्येक नागरिकांना आपले अधिकार व हक्क जाणून घेण्याची माहिती असावी यासाठी गावात राज्य घटनेची प्रत असावी. या उद्देशाने गाव तेथे संविधान देण्याचा संकल्प केला आहे.
आता पर्यंत सेवाग्राम परिसरातील ग्रामीण भागात 26 भारतीय संविधानाच्या प्रती वाटप करण्यात आलेल्या आहेत.
वर्धा तालुक्यातील सर्व गावात संविधान प्रत देण्याचा संकल्प केला आहे.असे कवडुजी ढेंगरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी दिनेश ताकसांडे, दिलीप शेंदरे, गोतंम भोंगाडे, विश्वनाथ बोंदाडे, मुरलीधर कुमरे, अविनाश गणवीर, पंकज शेंडे यांनी सहकार्य केले.
यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व कार्यक्रमाचे संचालन दीपक भोंगाडे यांनी केले.