प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
येरला :-
हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी येथील 64 वर्षे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक गावातीलच काही लोकांनी कल्टिव्हेटरच्या सहाय्याने उध्वस्त केले. दुसऱ्यांदा सोयाबीनचे सहा एकरांतील पिक तननाशक मारून उध्वस्त केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संबंधीत तक्रारीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी सांगत आहे. शेतकऱ्यांनी पाच जणांची तक्रार पोलीस स्टेशन, तहसीलदार यांच्याकडे केली असून त्याच्यावर योग्य कारवाईची मागणी केली आहे. पिपरी येथील शेतकरी किसना आत्माराम दुर्ग (वय 64) यांचे मौजा पिपरी शिवारात वडीलाची सव्वा सहा एकर शेत आहे. त्यांनी संपूर्ण शेतात सात बॅग सोयाबीनची पेरणी केली. खतही दिले. पेरणीच्या काही दिवसानंतर पेरणी केलेली सोयाबीनची 5 युवकांनी कल्टिव्हेटरच्या साह्याने नष्ट केले. याबाबत शेतकरी किसना दुर्गे यांनी महसूल विभागाला आणि पोलीस प्रशासनाला लेखी तक्रारी दिल्या, मात्र त्या प्रकरणाची कुठलीही चौकशी झाली नाही. शेतकऱ्यांनी शेत खाली राहू नये म्हणून दुबार सोयाबीनची पेरणी केली. शेतातील सोयाबीनचे पीक जोमात असताना मात्र, पुन्हा तन नाशक औषध फवारणी करून सोयाबीनचे पीक जाळून टाकले.

शेतकरी याबाबत शेतकरी किसना दुर्गे यांनी गावातीलच पाच जणांविरुद्ध घडलेल्या प्रकाराबाबत उपविभागीय महसूल अधिकारी यांनाही तक्रार दिली. अद्यापही शेतातील चौकशी करण्यात आली नाही, तन नाशक फवारल्याने पीक उद्ध्वस्त होऊन जवळपास 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी दुर्गे यांनी सांगितले. याबाबत प्रशासनाने चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी किसना आत्माराम दुर्गे यांनी केली आहे.
शेतकऱ्याला पेरे पत्र देण्यास नकार
पिंपरी येथील तलाठी यांच्याकडे शेतकरी किसना दुर्गे यांनी सन 2020- 21 चे पेरेपत्र व सातबारा ताबा प्रमाणपत्र मिळण्याकरिता अर्ज केला. परंतु तर त्यांनी नकार दिला कागदपत्रे देण्यासाठी अधिक पैसे घेण्यात आले. अशी लेखी तक्रार शेतकरी केली आहे.