वर्धा :
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनी १७ नोव्हेंबर जिल्हा शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हा कार्यालयात अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडी जिल्हा संघटिका वंदना भुते होत्या. सभेची सुरुवात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे यांचे हस्ते भगवा ध्वजारोहण करून करण्यात आली.

उपस्थित शिवसैनिकांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्रपणे अभिवादन करण्यात आले. प्रसंगी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे,निवासी उपजिल्हाप्रमुख अभय अमृतकर, तालुका प्रमुख गणेश इखार, शहरप्रमुख अँड.उज्वल काशीकर, उपतालुका प्रमुख निलेश वैद्य,संजय गांधी निराधार योजना सदस्य प्रदीप मस्के, मागासवर्गीय सेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोहर नाईक, सालोड जिल्हा परिषद विभाग प्रमुख सुनील डोंगरे,निवृत्त पोलीस अधिकारी वासुदेवराव बोन्द्रे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ जोशी, उपतालुका मारोती जगताप, अक्षय उईके, अर्जुन भुते, ज्येष्ठ शिवसैनिक मुकुंद काका ठाकरे, पत्रकार अण्णा तिवारी, उपशहर प्रमुख अमोल कुबडे आदींची उपस्थिती होती.