Thursday, September 19, 2024
Homeवर्धावृध्दापकाळात वयोवृध्दांना कृत्रिम अंग साहित्यामुळे मिळणार आधार

वृध्दापकाळात वयोवृध्दांना कृत्रिम अंग साहित्यामुळे मिळणार आधार

              -खासदार रामदास तडस

Ø वयोवृध्दांना कृत्रिम अंग साहित्याचे वाटप

Ø राष्ट्रीय वयोश्री योजना

वर्धा :-वयोवृध्दांना वाढत्या वयोमानानुसार कमी ऐकू येणे, चालण्याचा त्रास, दात पडणे यासारख्या येणा-या अडचणीवर वयोवृध्दांना देण्यात येणा-या कृत्रिम अंग साहित्यामुळे वृध्दापकाळात मोठा आधार मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आज कृत्रिम अंग साहित्य वाटप कार्यक्रमात केले.

आज सामाजिक न्याय भवन येथे केंद्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण कंपनीच्या (अलीम्को) वतीने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने केंद्र शासनाच्या वयोश्री योजने अंतर्गत वयोवध्दांना कृत्रिम अंग साहित्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पंचायत समिती सभापती महेश आगे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, उपायुक्त जातपडताळणी शरद चव्हाण आदी उपस्थित होते.

वयोवृध्दांना वयोमानानुसार कमी ऐकू येणे, दात पडणे, चालण्यास त्रास होणे अशा वृध्दापकाळात येणा-या अडचणीवर मात करण्यासाठी वयोवृध्दांना कृत्रिम अंग साहित्या मोठा आधार मिळेल यासाठी केंद्र शासनाने वयोश्री योजना सुरु केली आहे. योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या अधिकृत कंपनी मार्फत व्हिल चेअर, काटया, कर्णयंत्र, वॉकर, आदी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. योजनेचा वयोवृध्दानी लाभ घेण्याचे आवाहन श्री. तडस यांनी यावेळी केले. यासाठी केंद्र शासनाने बजेट मध्ये विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच दिव्यांगांसाठी सुध्दा कृत्रिम अंग साहित्याचे वाटप करण्यात येत असून दिव्यांगांनी सुध्दा कृत्रिम अंग साहित्याचा लाभ घ्यावा. यासाठी लाभार्थ्यांनी नोंदणी करावी असेही श्री. तडस म्हणाले.

वयोवध्दांना कृत्रिम अंग साहित्यांमुळे दुस-यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. व वृध्दापकाळात या साहित्याचा मोठा आधार मिळणार असल्याचे श्रीमती सरिता गाखरे यांनी यावेळी सांगितले. तर वृध्दाना त्यांच्या कुंटूबाकडून काही त्रास होत असल्यास किंवा समस्या असल्यास प्रशासनाकडून सोडविण्यात येईल यासाठी त्यांनी तहसिल कार्यालया मार्फत अर्ज सादर करावा. तसेच आरोग्य बाबत समस्या असल्यास शासकीय रुग्णालयात वयोवृध्दांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांचे हस्ते व्हिल चेअर, वॉकर, काठया, कृत्रिम दात व कर्ण यंत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राद्यापक, कर्मचारी वयोवृध्द लाभार्थी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular