वर्धा :
लहान बाळ बोलायला शिकते ते शाळा ते महाविद्यालय येथून पदवी घेईपर्यंत बालवयात व विद्यार्थी अवस्थेत अनेक प्रश्न पडतात ज्यांचे शास्त्रीय पद्धतीने उत्तर त्यांना दिले जात नाही तर ऐकिव माहिती सत्यापन न केलेली, कोणीतरी विशिष्ट व्यक्ती बाबा, महाराज,देवी,स्वामी,गुरू यांनी सांगितलेले उत्तर तसेच ग्रन्थात दिलेली माहिती न तपासता पुढील पिढीला सांगितली जाते तर समाजात वावरताना अनेक समस्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यातून सुटका मिळवण्यासाठी अनेकदा पुजा, यज्ञ कर्मकांड, उपवास, राशीच्या अंगठ्या वापरने, कालसर्प योग, नारायण नागबळी या सारखे अवैज्ञानिक कृती करून मुक्ती मिळविण्यासाचा असफल प्रयत्न केला जातो त्यामुळे माणूस हा प्रयत्नवादा पासून दूर जावून अंधश्रद्धेच्या आहारी केव्हा जातो हे कळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी शब्द प्रामाण्य व ग्रन्थ प्रामाण्य नाकारून चिकित्सा करावी असे आवाहन मार्गदर्शन करताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी विद्यार्थ्यांना केले
२८ फेब्रुवारी या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून सुशिल हिंमतसिंगका माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे रामन इफेक्ट या प्रयोगासाठी डॉ सि.व्ही.रमण यांना मिळालेल्या नोबल पारितोषिकाची विध्यार्थ्यांना उजळण व्हावी व विज्ञानाच्या प्रसार प्रचारात सहभागी होवून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शक म्हणून गजेंद्र सुरकार यांना निमंत्रित करण्यात आले होते यावेळी मंचावर प्राच्यार्या मा पदमाताई तायडे , पर्यवेक्षक कोपुलवार सर,विषेश शिक्षक सुकळकर सर, शिक्षिका ज्योत्स्ना पाटील प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी मार्गदर्शन करताना गजेंद्र सुरकार यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन यातील मुख्य मुल्य असलेले निरीक्षण समजावून सांगताना ब्रम्हम सत्य जगत मिथ्या हे वाक्य कसे फसविते हेसांगितले तर हवेच्या दाबाचा नियम सांगून खाली गोव्यातून पाणी कसे निघाले,गुरुत्वमध्य हा समजावून सांगताना प्रश्न चिन्हावर चामड्याचा पट्टा कसा स्थिरावला हा प्रयोग दाखवून अनेक उदाहरणे दिले, कोणाचेही प्रश्न तंत्रमंत्राने, आध्यात्मिक शक्तीने, तपस्या करून सोडविता येत नाही यासाठी लोखंडी लंगर सोडविणे हा प्रयोग प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना सहभागी करून दाखविला,तर जळता कापूर हातावर खेळणे तो तोंडांत गिळणे हा चमत्कार नसून तिन सेकंद पर्यंत तळहाताला चटका बसत नाही तोंडांत टाकला तर ऑक्सिजन न मिळाल्याने तो विझतो तोंड ओलसर असल्यामुळे जिभेला चटका बसत नाही हा प्रत्यक्षपणे चमत्कार करून दाखवला असे अनेक विज्ञानाचे प्रयोग करून ते शिकण्याचे आवाहन विध्यार्थ्यांना केले अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कोणतीही गोष्ट स्विकारतांना,कृती करताना विध्यार्थ्यांनी चिकित्सा करुनच स्विकारावी त्यासाठी शिक्षक,आई बाबा, कुटूंबातील ईतर व्यक्ती संपर्कात येणा-या व्यक्ती यांना का कसे हे प्रश्न विचारूनच आपल्या बुध्दीमत्तेच्या कसोटीवर तपासून मगच स्विकारावे असे आवाहन केले
यावेळी विध्यार्थ्यांनी डॉ सि व्ही.रमण यांच्या जिवणकार्यावर,त्यांच्या विज्ञानाच्या योगदानाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा पाखरे, सुत्रसंचालन रूपल लेन्डे, तर आभारप्रदर्शन यशस्वी ढवळे हिने केले.