Friday, April 12, 2024
Homeवर्धावर्धा विभाग मोहीम द्वारे तिथी प्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

वर्धा विभाग मोहीम द्वारे तिथी प्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

वर्धा :


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार गुरूवारला जयंती निम्मित छत्रपती शिवरायांच्या स्मारक ला दुग्धभिषेख करण्यात आला.मल्यार्पण व शिव पूजन करण्यात आले.या प्रसंगी हातात फलक घेऊन छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख न व्हावा या साठी जनजागृती मोहीम राबवण्यात आली.या वेळी साहिल दरणे यांच्या कडून तरुणांना मार्गदर्शन केलं व सारंग रघाटाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेंच प्रतीक पवार यांनी थोडक्यात सर्व मान्यवरांचे आभार मानले या वेळी मोठ्या उत्साहाने तरुण व तरुणी उपस्थित होत्या या शिव पुजनेकरिता गुडिया मस्के , माहेश्वरी कुकूर्दे ,अंशिका मारवाडे,तन्वी बुरांडे , प्रतीक पवार , अनिश काळे , रोशन घागरे, तेजस ठाकरे, भावेश नेवारे , रुद्राक्ष राठोड, अथर्व मिराजपुरे , समिर पंढारकर, अनिल नराळे, विवेक चाफले,विशाल सिंघ , चिन्मय पोहेकर ,राजेश गोटी, चैतन्य उभाळे, ओम भेदुरकर, जय कोसे, गौरव चौधरी , राकेश भाऊ वाखडे, आकाश सुखदेवे ,आदित्य दरने , निखिल सहुरकर, अभिजित खनंग , उत्कर्ष सोनटक्के, अनिल चव्हाण इ.ची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular