वर्धा : तालुक्यातील आशा गट प्रवर्तक यांचा मेळावा
पिंपरी मेघे येथील ग्रामपंचायत कार्यालय महिला बचतगट हॉल मध्ये घेण्यात आला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संगीता भलमे होत्या. कार्यक्रमास सीटूचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, जिल्हा सचिव भैय्याजी देशकर , पांडुरंग राऊत , आशा संघटनेच्या जिल्हा सचिव अर्चना घुगरे , गटप्रवर्तक संघटनेच्या सुषमा गुस्नुले , चारुलता गोडे , अर्चना मून , अलका पूरी , भारती बोकडे , संध्या वानखेडे यांचे उपस्थिती होती.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पमाला अर्पन करुन मेळाव्यास करण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हा सचिव अर्चना घुगरे यांनी 3 वर्षातील कामकाजाची आंदोलनाची माहीती दिली . मेळाव्याचे उद्घाटक सीटूचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी आशा गटप्रवर्तक यांचे समस्या व शासनाची भुमिका बाबत सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच संघटना मजबुत करणे जरुरी असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हा सचिव भैय्याजी देशकर यांनी जिल्हा अधिवेशन व राज्य अधिवेशनाची माहीती देवुन केंद्र व राज्य शासनाचे कामगार विरोधी धोरणा विरुद्ध पुढील लढ्यासाठी सज्य राहण्याचे आवाहण केले . तसेच आशा गटप्रवर्तकांनी विविध समस्या मांडल्या . त्याबाबतीत संघटनेच्या वतीने कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले . अखेर पुढील 3 वर्षासाठी वर्धा तालुक्याची कार्यकारणी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आली . अध्यक्षा शुभांगी साटोणे , उपाध्यक्षा माधुरी लोणकर , प्रमीला झाडे , सचिव सविता गुल्हाने , सहसचिव लता नगराळे , सुवर्णा मुंदाने , कोषाध्यक्ष राणी हेडाऊ , कार्याध्यक्षा अमृता चलाख , संघटक म्हणून शारदा ढोणे , कार्यकारणी सदस्या म्हणून अलका वानखेडे , विद्या चौधरी , उषा उघडे , रुपाली वाघाडे , ज्योत्सना कंडे , दिपमाला वाघमारे , रुपाली राऊत , संध्या कांबळे , शैलेजा लोहकरे , नलीनी सातपुते , जयमाला झाडे , सरीता झाडे , सुमित्रा वसुले , ज्योती मांजरे , सिमा वानखेडे , इशा झाडे , दुर्गा ठाकरे इत्यादी कार्यकारी सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली . मेळावा यशस्वी करण्यासाठी रमा ढोले , पुष्पा मानीककुळे , माधुरी शिंदे , साधना जोगे , दिपमाला वाघमारे , रुपाली राऊत , रंजना भांगे , साधना मेंढे , छाया वझे , मंजुषा बघेकर , जयश्री उमक , लिना तेल्हे , कांचन दांडेकर , सिमा वानखेडे , ज्योत्सना कंडे , उषा रघाटाटे , सुलोचना सावरकर , वेणु कोसुरकर , इशा झाडे , दुर्गा ठाकरे , माया जुनघरे , विद्या चौधरी , दिक्षा वाघमारे , सारीका गुल्हाने , वृंदा थुल , रेखा शेंद्रे , निलीमा सोनवने , संजय भगत , प्रभाकर धवने , आदींनी सहकार्य केले.