वर्धा :
वर्धा रामनगर येथे संत नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त मंदिरात मोठा उस्साहात पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी संपूर्ण नाभिक बांधवाच्या उपस्थितीत होती.
अनेक समाज बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावा गावात संत नगाजी महाराज पुण्यतीथी साजरी करण्यात आली.

सलुन ब्युटीपार्लर असोसिएशन वर्धा जिल्हा ह्या संघटनेच्या माध्यमातून सलुन व्यवसाईक बांधवानमध्ये जनजागृती करण्यात आली. नाभिक समाजात प्रेमाचे व एक जुटीचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी जिल्ह्यामध्ये संत नगाजी महाराज पुण्यतीथी भावीक फार मोठ्या प्रमाणावर साजरी करतांना दिसत आहे. हे कार्य असेच वाढत राहुन सलुन असोसिएशनच्या माध्यमातून एकजुटीचे समाजसेवेचे वातावरण निरंतर वाढत राहो असे मत वर्धा जिल्हा अध्यक्ष अनिल केशवराव आंबुलकर यांनी व्येक्त केले.
रामनगर वर्धा येथे पालखी सोहळ्यात सलुन ब्युटीपार्लर असोसिएशन वर्धा , महाराष्ट्र पदाधिकारी संथापक अध्यक्ष लिलाधरभाऊ येवुलकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांतभाऊ वाटकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव सहदेव वाटकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आशिषभाऊ ईझनकर, महाराष्ट्र संपर्क प्रमुख निलेशभाऊ खरोडे, संपूर्ण महाराष्ट्र पदाधिकारी उपस्थित होते.
वर्धा जिल्हा अध्यक्ष अनिल आंबुलकर उपाध्यक्ष दिनेश पोहनकर, सचिव अंबादास अमरुतकर, सहसचिव संजय सूर्यवंशी, कोषाध्यक्ष स्वप्नील घुमे, सल्लागार संजुभाऊ पिस्तूलकर, उपसंपर्क प्रमुख रुपेशभाऊ सालफेकर , आशिष आंबुलकर, नरेशभाऊ लोनकर, तालुका अध्यक्ष भुषण दैयवलकर तसेच संपुर्ण तालुका पदाधिकारी व संपूर्ण शाखा पदाधिकारी तसेच मंदिरातील संपुर्ण कमेटितील सदस्य यांच्या नेतृत्वाखाली संत नगाजी महाराज पालखी कार्यक्रमास उपस्थिती होती.