सेवाग्राम- गजानन जिकार
८ आँगष्ट १९४२ रोजी मुंबईतील गोलाली टँक (आताचे आझाद मैदान) वरुन महात्मा गांधी यांनी अंग्रेजो भारत छोडो. “चले जाव” चा नारा दिला. १६ आँगष्ट १९४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी वं. राष्टसंत श्री तुकडोजी महाराजांच्या नेत्रूत्वाखाली संपूर्ण विदर्भ पेटून उठला. यावली,आष्टी,चिमुर,बेलोडा,लोणी, उत्तमगाव, हि गावे स्वातंत्र्याच्या ईतिहासात अमर झाली.४०च्या वर भारतीय स्वातंत्र्य प्रेमी गोळीबारात शहीद झाले. हजारो भारतीयांना तुरूंगात डांबले.१४ भारतीयांना फासीची शिक्षा झाली. महात्मा गांधींच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशातून क्रांतीची हि लाट गावात आली. वं.राष्टसंताचे पुढाकाराने स्वातंत्र्य प्रेमी जनता पेटून उठून विदर्भा पासून खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरूवात झाली.त्या वेळेस राष्टसंताचे वय अवघे ३३ वर्षाचे होते.२१ सप्टेंबर १९४२ ला राष्टसंताना चंद्रपूर जिल्ह्यातील भिवापूर येथून अटक करून मध्येप्रदेश मधील रामपूर जेल मध्ये दोन महीने डांबून ठेवण्यात आले. २ डिसेंबर १९४२ रोजी राष्टसंताची रायपूर जेलमधून सुटका झाली. या ऐतिहासिक घटनेला आज ७९वर्षे पूर्ण होत आहे.

स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्टपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी वं.महाराजांना राष्टसंत हि उपाधी बहाल केली.दिल्ली येथील राष्टपती भवनात भजन गानारे एकमेव संत म्हणजे राष्टसंत तुकडोजी महाराज होय. भारत -चिन.भारत -पाकिस्तान युद्धाच्या प्रसंगी देशाच्या सिमेवर जावून वं.राष्टसंतानी भारतीय सैनिकांत विररसाचे स्फूर्तीदायक भजन म्हणून उत्साह वाढवून राष्टप्रेमाची भावना जाग्रूत केली.आणि राष्ट्रीय एकात्मता जनकल्याण पर अनेक विषयांवर विपुल साहित्य लेखन केले.ग्राम विकासाला चालना देण्यासाठी सर्वव्यापक ग्रामगीता ग्रंथाचे लेखन केले.ते आजघडीला सर्वमान्य होऊन शासनाने त्यावर अभियानही राबविले.
भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. महात्मा गांधी. राष्टपती डॉ.राजेंद्र प्रसाद. सर्वपल्ली राधाकृष्ण.प्रियदर्शनी ईंदिरा गांधी. अशा अनेक राष्ट्रीय नेत्यांनी.समाजसुधारक. महात्मे. यांनी राष्टसंताच्या सर्वकष कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करून ग्रामगीता ग्रंथात प्रस्तावना म्हणून लिपीत समाविष्ठ आहे.
मानवतेचे महापुजारी वं.राष्टसंत श्री तुकडोजी महाराजांच्या अतूलनीय देशसेवा-कार्य पाहून भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच पुरस्कार देऊन गौरवीत करावे. अशी मागणी वं.राष्टसंताचे संत साहित्य प्रचारक माणीकदास रामकृष्णदादा बेलूरकर तसेच गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी सेवक प्रचारक यांनी केले आहे.