सेलू
वंदे मातरम डिफेन्स अकॅडमी कडून बक्षीस वितरण सोहळा वंदे मातरम डिफेन्स अकॅडमी सेलू यांच्या मार्फत सेलू शहरात प्रथमता पोलिस व सैन्य भरती पुर्व प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर 5 दिवशीय आयोजित केले असून या शिबिरात उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या युवकांना प्रथम द्वितीय, तृतीय, असे रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमाला सेलू पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड साहेब, तसेच साहासिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवी कोटंबकर, माजी सैनिक युवराज चांभारे, दैनिक साहासिक व्यवस्थापक गणेश खोपडे, गिरिधर बारई , बंटी सोमनाथे, वंदे मातरम डिफेन्स अकॅडमी चे संचालक सतिश गोमासे, माजी सैनिक मोहन गोमासे, माजी सैनिक लक्ष्मण गोमासे, माजी सैनिक मुकेश भावरकर, माजी सैनिक पुरुषोत्तम बजाईत, माजी सैनिक प्रितेश रामटेके, सैनिक ओमप्रकाश रघटाटे, सैनिक प्रतिक पाटिल, स्वनिल काळे, रविंद्र वानखेडे, सागर राऊत, निसार सय्यद, कैलास बिसेन, ,
पंकज तडस उपस्थित होते.