Monday, March 4, 2024
Homeवर्धाराष्ट्रीय जनसेवा पक्षाचा एस . टी . कर्मचारी आंदोलनास पाठींबा...

राष्ट्रीय जनसेवा पक्षाचा एस . टी . कर्मचारी आंदोलनास पाठींबा


वर्धा :
एसटी महामंडळ कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नाची त्वरित दाखल घ्यावी व इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यानाही सर्व शासकीय सुविधा मिळण्यासाठी एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे व त्यांना न्याय द्यावा संप मिटवावा यासाठी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.


राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने एस . टी. प्रवास बंद असल्यामुळे प्रवाश्यांना त्रास सोसावा लागत आहे. त्या करिता वर्धा जिल्ह्यातील एस . टी . बसेस तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण बसेस चालू करण्यात यावे. महाराष्ट्रातील एस . टी . महामंडळ कामगारांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा, एस टी कर्मचारी अनेक वर्षांपासून हलाखीचे जीवन जगत आहे . इतर शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे त्यानाही सर्व शासकीय सुविधा मिळण्यासाठी एस टी . महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे व राज्य सरकारने सदनशीर मार्गाने लवकरात लवकर राज्यातील प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाचा एस . टी . कामगार यांच्या संपास पूर्ण पाठींबा असेल त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.जिल्हाध्यक्ष अनिल अंबुलकर यानी आंदोलकांची भेट घेऊन. पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular