समुद्रपुर:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 53 व्या पुण्यतिथी निमित्य गिरड येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने 25 आक्टोबर रोजी स्वच्छता महायज्ञ आणि मौन श्रद्धांजली कार्यक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 53 व्या पुण्यतिथी निमित्य सकाळी सामुदायिक ध्यान,ग्रामस्वच्छता महायज्ञ् कार्यक्रम राबवून गावातील मुख्य मार्गांवरील स्वच्छता करण्यात आली या उपक्रमात गावातील मान्यवर, युवक, बाल गोपाल सहभागी झाले होते. सायंकाळी भजन संध्या कार्यक्रम,4.58 ला मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवंदनेने करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक वामन झिंगरे पुरुषोत्तम थुटे रवींद्र डरे प्रभाकर रोहणकर रामभाऊजी डेकाटे गोपीकृष्ण थुटे विष्णू ब्राह्मणवाडे बालू गलांडे विजय खोंड हरियार भांदक्कर लक्ष्मण दरवेकर सौरभ शेळके गौरव कावळे राकेश चौधरी गोपाल तेलरांधे चंद्रमणी टेंगळे नितीन लाजूरकर संकेत थुटे भूषण थुटे साहिल सोनवणे प्रभाकरजी दाते वृषभ तिजारे सचिनदादा उंबरकर
सौ रेखाताई डरे अर्चना बारवकर पुनम ब्राह्मणवाडे रोशनी तेलरांधे यावली झिंगरे कृष्णा गुंडे वैष्णवी गुंडे स्वरा भांदक्कर सुरेखा काळे या सर्वांची उपस्थिती होती.