दोन मोटरसायकल केले जप्त
हिंगणघाट : येथील पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटरसायकल चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाला सोपवण्यात आला होता.
हिंगणघाट पोलिस स्टेशनचे प्रकटीकरण पथकाचे शेखर डोंगरे
व पथकाने आरोपीचा शोध घेत असता डीबी पथकाने आपले जाळे रचून आरोपींना अटक केली यामध्ये मोटरसायकल चोरी मधील आरोपी शेख मोहसीन शेख सलीम वय २४ रा. हिंगणघाट व इसराइल उर्फ शाहिद रसूल खान पठाण वय २४ रा.समुद्रपुर
या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पोलिस स्टेशन समुद्रपूर हद्दीतून सुद्धा एक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. डी.बी पथकाने त्यांच्याकडून दोन्ही मोटर सायकल जप्त केल्या.
समुद्रपूर येथे पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेले भांदवी कलम ३७९ चा गुन्हा उघडकीस करण्यात आला.
ही कारवाई हिंगणघाट पोलिस स्टेशनचे ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे शेखर डोंगरे,विशाल बंगाले,सचिन घेवंदे,सचिन भालशंकर, निलेश तेलरांधे यांनी केली.