गडचांदूर – मो.रफिक शेख –
दिनांक ३१ ऑक्टोबर,२०२१ ला शहीद अश्फाक उल्ला खान मेमोरियल मल्टी पर्पज सोसायटी, बल्लारशाह यांच्याकडून भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक,क्रांतिकारक शहीद अश्फाक उल्ला खान यांच्या २२१ व्या जयंतीच्या पावन प्रसंगी जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलता, निपुणता, तत्परता आणि प्रामाणिकता या गुणांसह उल्लेखनीय कार्य करून राष्ट्र निर्माण आणि राष्ट्रीय सद्भावना वाढीस मदत करणाऱ्या समाजातील व्यक्ती व संस्थांना दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी शाल,स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देवून पुरस्कृत केल्या गेले. शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,श्री.खुर्शीद शेख,राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक,असरअली गडचिरोली व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ.शालिनी कुमरे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त,परिसेविका,गडचिरोली या दोघांना शहीद अश्फाक उल्ला खान स्मृती – राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार – २०२१ ने तर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री.बाबु खाज्यामियॉं शेख,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक, पंचाळा,चंद्रपूर श्री.राजेंद्र परतेकि,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,पालडोह,चंद्रपूर व श्री शबिर अली मीर जब्बार अली,निरीक्षक आरोग्य न. प. बल्लारशाह या तिघांना शहीद अश्फाक उल्ला खान स्मृती – समाजभूषण पुरस्कार -२०२१ ने सम्मानित करण्यात आले.

हिंदी साहित्यात पी एच डी पूर्ण करणाऱ्या डॉ. कु.बद्रूनिसा फारुख खान यांना प्रोत्साहन पर
तसेच कोरोना अपदेच्या काळात जन जनात अतिशय उत्तम सेवा देणाऱ्या रणरागिनी हिरकणी फाउंडेशन, बल्लारशाह तसेच विकलांग सेवा संस्था,बल्लारशाह यांना शहीद अश्फाक उल्ला खान स्मृती – विशेष पुरस्कार -२०२१ ने सम्मानित करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय बल्लारशाह येथे मा. मोहमद शरीफ सर,अध्यक्ष – शहीद अश्फाक उल्ला खान मल्टी पर्पज सोसायटी, बलारशाह यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला.या कार्यक्रमाचे सुंदर संचालन श्री.सलमान सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री.फारुख सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी व सोसायटी चे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.