कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
हिंगणघाट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी अतुल वांदीले यांना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

अतुल वांदिले यांनी प्रथम मनसेच्या शहर अध्यक्षपदापासुन आपली राजकीय कारकीर्द सुरु केली त्यांचे कार्य पाहुन त्यांना तालुका अध्यक्ष नंतर जिल्हा उपाध्यक्ष त्यानंतर जिल्हा अध्यक्ष व आता राज्याचे उपाध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे. शहर अध्यक्ष पदापासून ते राज्य उपाध्यक्षपदा पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास असून मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साह संचारला असून राज्यभरातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.