जनजातीय गौरव सप्ताहा अंतर्गत हिंदी विश्वविद्यालयाचा पुढाकार
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस म्हणून साजरी केली व जनजाती गौरव सप्ताहा अंतर्गत विभिन्न कार्यक्रम आयोजित केले. या निमित्त विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांच्या पुढाकाराने व त्यांच्या मार्गदर्शनात सोमवार 22 नोव्हेंबर रोजी वर्धा शहरातील गिरिपेठ, शांती नगर, नालवाडी, मसाड़ा आणि पवनार या आदिवासी बहुल पाच वस्त्यांमध्ये जवळपास 500 कुटुंबांना मिठाई आणि लहान मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कुलगुरु प्रो. शुक्ल यांनी या निमित्त दिलेल्या संदेशात आदिवासी सेनानींच्या स्मरणार्थ विश्वविद्यालयाकडून दरवर्षी जनजाती गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येईल तसेच येणाऱ्या पीढीला स्वातंत्र्य आंदोलनात आदिवासी सेनानींनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करुन देण्यात येईल असे सांगितले.
सांस्कृतिक ठेवा संरक्षित करणे व राष्ट्रीय गौरव, आतिथ्याची भारतीय मूल्य टिकवून ठेवणे व आदिवासींनी दिलेल्या लढ्याचा सन्मान ठेवणे आवश्यक आहे अमेठी ते म्हणाले. यावेळी विश्वविद्यालय परिवारातील सदस्यांनी मुलांना भगवान बिरसा मुंडा यांचे साहसिक कार्य व इतिहासाविषयी माहिती दिली. डॉ. प्रकाश नारायण त्रिपाठी, डॉ. मिथिलेश, डॉ. शिव सिंह बघेल, डॉ. आदित्य चतुर्वेदी इत्यादिंनी मिठाई व शैक्षणिक साहित्य वितरणात सहकार्य केले.