Saturday, May 28, 2022
Homeवर्धाप्लेटलेट्स साठी रक्तदान शिबिर

प्लेटलेट्स साठी रक्तदान शिबिर

हिंगणघाट :
दिवसेंदिवस सर्वत्र डेंग्युचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून बहुतेक रुग्णांना प्लेटलेट्सची गरज पडत असते.परंतु गरीब रुग्णाना त्या विकत घेणे शक्य नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णाची ही दयनीय अवस्था ओळखून रुग्णमित्र गजू कुबडे यांनी प्लेटलेट्स साठी सेवाग्राम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
यात प्लेटलेट व एस डी पी साठी च्या निकषात बसणाऱ्या १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
डेंग्यूच्या रुग्णाना संभाव्य प्लेटलेट्सची व्यवस्था होणार आहे.


या शिबिरासाठी रुग्णसेवक विनोद खंडाळकर यांच्या नेतृत्वात रुग्णसेवक मंगेश मुडे, रुग्णसेवक सौरभ गोडे, रुग्णसेवक सागर आत्राम, प्रहारचे अन्य कार्यकर्ते सतिश गलांडे,सूरज कुबडे,मंगेश गंडे,युवा परिवर्तनचे निहाल पांडे,विजय पडोळे,सादिक शेख,अक्षय मुंजेवार,चेतन भगत विक्रात भगत विनोद भोमले,कांचन पोफारे, दिनकर शेंडे,सचिन लादंग,वृषभ नटे, आशिष धुर्वे,अक्षय नागोसे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular