तालुका अध्यक्ष सुनीता गायकवाड कार्यध्यक्ष धीरज चौधरी
वर्धा :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासोबत मानवान मध्ये विवेकी वीचार रुजविण्याचे कार्य करीत असुन समाजाला व आजच्या पीडिला अंधश्रद्धेपासून दुर नेण्याचे कार्य करीत आहे. समितीचे मुख्य प्रवर्तक शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर असून याच मातृ संघटनेची स्थापना पुलगाव येथे वर्धा जिल्हा अध्यक्ष नरेंद्रकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आली.

यावेळी वर्धा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र कांबळे यांनी समीतीचे उद्देश व ध्येयधोरणे या विषयी माहिती दिली. वर्धा जिल्हा प्रधान सचिव रमेश निमसडकर यांनी उपक्रमाची माहिती दिली. जिल्हा कार्यध्यक्ष नम्रता भोंगाडे हिने शाखा कार्यपद्धतीची माहिती दिली. बुवाबाजी रोखथांब व भोंदूबाबा कडून होणारी फसवणुक कशी थांबवयाची या बाबत बुवाबाजी विभाग प्रमुख चंद्रकांत बनसोड यांनी माहीती दिली.
समिती स्थापण्या पूर्वी सुप्रशिद्ध कवी साहितीक पद्माकर अंबादे यांनी अंधश्रद्धेवर प्रबोधनात्म कविता सादर केली.
पुलगाव समितीच्या अध्यक्ष पदी सुनिता गौतम गायकवाड यांची नियुक्ति करण्यात आली. उपाध्यक्ष पदी शशीकांत गजभिये ,तालुका कार्यध्यक्ष धीरज चौधरी,
विविध उपक्रम प्रमुख पद्माकर अंबादे,तालुका महिला विभाग प्रमुख नम्रता बांबोर्डे ,युवा वाहिनी विभाग दिनेश मून,सांस्कृतिक विभाग प्रमुख विजय टेभूरने,बुवाबाजी विभाग प्रमुख प्रफुल लोणकर, सदस्य पदी चंद्रकला पाटील , शशिकलाताई वाणी,नीलम राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन नम्रता भोंगडे हिने केले. शशिकला पाटील यांनी आभार मानले.