Tuesday, February 27, 2024
Homeवर्धापाण्यात बुडून म्हैसीचा मृत्यू

पाण्यात बुडून म्हैसीचा मृत्यू

रणमोचन येथील घटना: पशुपालक आर्थिक संकटात: 80 ते 85 हजार रुपयांचे नुकसान
ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील सुमित्रा गोपाल सहारे वय(55) ह्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिलेने म्हैस सराईसाठी सोडले असता् म्हैस पाणी पिण्यासाठी गावालगत लागून असलेल्या भुतिया नाल्यात गेली असता ती खोल पाण्यात बुडाल्याने मरण पावली यात सुमित्रा गोपाल सहारे यांचे अंदाजे 80 ते 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


सुमित्रा सहारे यांचा दुग्ध व्यवसायावर उपजिविका अवलंबून असून ते दुधापासून दही तूप तयार करून विकतात
त्यांना मुळातच शेतजमीन नाही शिवाय परिस्थिती ही गरिबीची आहे केवळ दुधाच्या व्यवसाय करूनच कुटुंबाचा गाडा चालवावा लागतो मात्र अशातच रोज सकाळी 20 ते 25 लिटर दूध देणारी दुधाळु म्हशीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे
दररोज प्रमाणे दिनांक २०जुलै रोजी जवळपास १२ वाजता म्हैस सराई साडी सोडलीमात्र पाणी पिण्यासाठी गेली असता म्हैस खोल पाण्यात बुडाली त्यामुळे त्यांचे जवळपास 80 ते 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

1 COMMENT

Most Popular