तळेगाव(शा.पंत) : – स्थानिक दुर्गा माता देवस्थान सभागृहात, नेहरु युवा केंद्र, वर्धा व प्रांजली सामाजिक संस्था चिस्तुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी भगवान श्रीकृष्णाने टांगेवाला होऊन अर्जुनाला मार्ग दाखवला. आपल्याला सुद्धा टांगेवाला होऊन इतरांचे मार्गदर्शक होता आले पाहीजे असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहीत्याचे प्रचारक अरविंद राठोड यांनी केले.
कोरोना नियमाचे पालन करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. उमेश पवार, प्रमुख अतिथी सरपंच छबुताई खंडारे,ग्रामसेवक संजय यावले,माॅडेल हायस्कुलचे सुर्यवंशी , संस्था अध्यक्ष राहुल लाखे, नृत्य प्रशिक्षक मोनाली डाफे, विजया सुकलकर,
नुतन कन्या विद्यालयाच्या मोरे ,पञकार राजेंद्र खंडारे,निलेश बंगाले,मयुर वानखडे, दिपक चौधरी, ग्रा.पं.सदस्य रुपेश बोबडे,पोलिस कर्मचारी अमोल इंगोले आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी पञकार निलेश बंगाले व गुरुकुंज आश्रमचे अरविंद राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
आयोजित युवा महोत्सव नृत्य स्पर्धेकरीता स्पर्धकांची नोंद घेण्यात आली. एकल नृत्य प्रकारात प्रथम पारितोषिक वैष्णवी खंडारे, द्वितीय चैताली माने व तृतीय प्रियंका माकोडे हीने पटकावले. समूह नृत्य प्रकारात प्रथम पारितोषिक लाडो ग्रुप, द्वितीय ब्राईट स्टार ग्रृप व तृतीय जलवा या देशभक्ती गीताला देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. उमेश पवार, मोनाली डाफे व चंद्रशेखर दुर्गे यांनी काम पाहले.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर दुर्गे ,प्रास्ताविक राहुल लाखे यानी केले. सुरज लाखे यांनी आभार मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता ग्लोबल कंप्युटर च्या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.