पुलगाव : देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे ऋषिकेश जामकुटे यांच्या शेतातील घरामध्ये साप असल्याची माहिती प्रतीक जनबंधु यांनी सर्पमित्र मनीष घोडेस्वार व हर्षित मून ,लकी जांभुलकर, यांना दिली , लगेच सर्पमित्र घटनास्थळी पोहचून या अतिशय दुर्मिळ (Indian smooth snake) गजरा सापाला सुरक्षित पकडून पुलगाव वनविभागाच्या मदतीने सुखरूप नैसर्गिक अधिवासात जीवदान देण्यात आले.
गजरा( भारतीय मृदू सर्प) हा साप बिनविषारी असून, त्याची अधिकतम लांबी २ ते ३ फूट असते. या सापाची लांबी 22 इंच पुलगाव वनविभागात नोंदविली गेली. झुरळी, पाल, सरडा, लहान बेंडूक हे त्याचे मुख्य भक्ष्य आहेत,
हा साप लाजाळू गटात मोडत असल्याने शक्यतो मानवी वस्तीकडे फिरकत नसल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.
त्यावेळी सर्पमित्र नकुल ठेमस्कार, ,मंथन नंदेश्वर, निखिल डोंगरे ,रितीक पाटील, मयुर कुंतल, निखिल उमरे,सिद्धांत घोडेस्वार, वैभव वनकर,सिद्धांत दहाट, उत्कर्ष चौधरी ,पूनम उपाध्ये,आकाश जांभुळकर, ऋषभ घरडे, समर्थ नंदेश्वर, राहुल थोरात, प्रशिक निकोसे, प्रतीक भगत, प्रणय बोदीले, प्रणय नंदेश्वर, पलाश गजभिये आदी सर्व सर्पमित्र उपस्थित होते.