अंबिका सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
वर्धा :
आधी दिवाळी गरिबांची व नंतर माझी असा संकल्प करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंबिका हिंगमीरे यांनी दिवाळीपूर्वीच वर्ध्यातील गोरगरीब आणि वंचितांच्या कुटुंबात गोडवा निर्माण केला.अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने पाच हजारांपेक्षा अधिक गरीब कुटुंबांना रवा साखरेचे वाटप करून त्यांच्या आनंदात सामील झाले. मंगळवारी दिवसभर हा उपक्रम वर्ध्यातील विविध भागात राबविण्यात आला.
वर्धा येथील दयाल नगर,शांतीनगर झोपडपट्टी,पडपा झोपटपट्टी, नागसीन नगर, सावजी नगर, पिंपरी मेघे, इरिगेशन झोपटपट्टी या भागात वास्तव्य करणाऱ्या गरीब, वंचित, निराधार नागरिकांना अंबिका हिंगमीरे यांच्या हस्ते रवा आणि साखरेचे वाटप करण्यात आले. सकाळपासून तर रात्रीपर्यंत हा उपक्रम सुरू होता. ऐन दिवाळीच्या दिवसात गरिबांची दिवाळी आनंदमय केल्याने गोरगरीब वंचित आणि निराधार नागरिकांनी अंबिका हिंगमीरे यांना आशीर्वाद देखील दिले.
अंबिका सोशल फाउंडेशन, वीरांगणा ब्रिगेड आणि श्रमिक ईमारत व ईतर बांधकाम कामगार संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाला वर्धा नगरपालिकेचे माजी सभापती सलीम कुरेशी, होरेश्वर कोरडे,मयूर लांबट, रवींद्र लाखे, मनोज तडस, किशोर खोडके, राहुल काटवे, आकाश नेहारे,मुरली कुमरे, मनोज तेलरांधे ,प्रदीप रघाघाटे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
बाँक्स.
*नागरिकांशी संवाद साधून जाणल्या समस्या*
अंबिका हिंगमिरे यांनी यावेळी गरीब नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . यावेळी नागरिकांनी विविध समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर मांडला . हिंगमिरे यांनी यावेळी तुमच्या समस्यांसाठी मी सदैव तत्पर असून वेळ पडल्यास येत्या काही दिवसांत मोठे आंदोलन देखील करू. असा विश्वास अंबिका हिंगमिरे यांनी दिला .
बाँक्स
नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन मी नेहमी त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असते . राजकारणाला नव्हे तर समाजकारणाला मी जास्त महत्त्व देते , त्यामुळे विरोधकांना मी घाबरत नाही , मी सदैव गरीब , गरजूंच्या पाठीशी उभी आहे , असे प्रतिपादन वीरांगना ब्रिगेडच्या संस्थापक तसेच श्रमीक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमिरे यांनी केले .