येरला :- प्रमोद झिले
हायवे क्रमांक सात वर दारोडा टोल नाका हा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. येथील काम करणारे कर्मचारी यांच्या दादागिरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या कर्मचाऱ्यांना नेमप्लेट बंधनकारक असून सुद्धा हे नेमप्लेट लावत नाही. सगळ्याच कायद्यांना ढेंगा दाखवून मनमानी कारभार सुरू आहे. वडनेर टोल नाक्यावरील स्वछतागृहात अस्वच्छ आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात टोल आकारणी करणाऱ्या कंपन्या प्रवाशांना साफ स्वच्छतागृह देखील देत नाहीत. संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी. टोलनाक्यावरील काही सीसीटीव्ही बंद असल्याचेही समजले आहेत ज्याच्यामुळे अपराधी वृत्ती चे लोकांना याचा फायदा होऊ शकतो.
परंतु याकडे टोल प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत .रोज लाखो रुपयांची टोल वसुली करणाऱ्या टोल प्रशासनला ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे सुरू करण्यास वेळ नाही की आम्ही कोणालाच जुमानत नाही, असा संदेश देत आहे .
नागरिकांना फोन करण्यासाठी सुविधा नाही.अपघात झाल्यावर ॲम्बुलन्स वेळे वर पोहोचत नाही . तसेच टोलपासून जवळजवळ 500 फुटांपर्यंत उंच डिवायडर लाईट्स लावण्यात आले आहे,परंतु रात्रीच्या वेळेस बंद असतात व बरेच लाईट्स नादुरूस्त अवस्थेत आहे.
टोल प्लाझा चे व्यवस्थापक यांचे अजिबात लक्ष नाही . काही रस्त्यावरील समस्या असल्यास व्यवस्थापक फोन घेत नाहीत . टोल नाक्यावरील कामगार लोक नागरिकांना दमदाटी अरेरावी करतात. हा टोल नाका सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कर्मचाऱ्यांची दादागिरी, टोल कंपनीची अवाजवी वसुली यासह अनेक तक्रारी आहेत.