-ग्रामिण भागाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
समुद्रपुर : तालुक्यातील गिरड ते तावी रस्त्यावर मोठ्या मोठ्या जिवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून या रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे.मात्र या संबंधी प्रशासानाला व लोकप्रतिनिधींना वेळोवेळी कळवून सुध्दा त्यांच्या डोळेझाक पणा सुरू असल्याने नागरिकांना छोट्या मोठ्या अपघाताला सामोरी जावे लागत असुन नाहक त्रास होत आहे. पाऊसाच्या पाण्याने येथिल मोठे मोठे खड्डे तुळुंब भरुन रोज अपघात होत आहे.

या रस्त्यावर वाढत्या अपघातावर आळा घालण्यासाठी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मोहगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास नवघरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलेल्या निवेदनातून केली होती.मात्र या रस्त्याची अवस्था जैसेच्या तैसेच आहे.यामुळे या रस्त्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधीनी यांचे साफ दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे.विशष म्हणजे हा रस्ता चंद्रपुर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असुन गिरड येथिल पर्यटन स्थळाशी निगडीत आहे.या रस्त्याने उन्हाळ्यात,व हिवाळ्याच्या दिवसात चंद्रपुर जिल्ह्यात भाविक मोठ्या प्रमाणात गिरड येथे दर्शनासाठी येत असतात. गिरड ते तावी रस्त्याची निर्माण सन २००५-६ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आली होते. आता या निर्माण कार्याला १५ वर्षे उलटल्याने व रस्ताची डागडुईच्या कमतरतेने या रस्त्याची दैनीय अवस्था झालेली आहे. या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांसाठी आता हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. सन२००५- ६ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गिरड ते तावी ८.५० किलोमीटरच्या रस्त्याचे निर्माण कार्य करण्यात आले होते. रस्त्याच्या देखरेखीची अभावाने हा रस्ता आता.आर्वी फरीदपूर मोहगाव येथील नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या रस्त्याची संपूर्ण दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठे मोठे जीव घेणारे खड्डे निर्माण झाले आहे. या रस्त्याने तावी मोहगांव आर्वी फरीदपूर येथील शेकडो विद्यार्थी सायकलने प्रवास करीत गिरड समुद्रपूर येथे शिक्षण घेण्याकरिता जात असतात. मात्र आता त्यांच्या शिक्षणात हा रस्ता अडथळा निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना या रस्त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खराब झालेल्या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सायकली वेळोवेळी पंचर होतात खराब होतात. तर कित्येक विद्यार्थांना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताला समोर जावे लागले आहे. या मार्गाने चालत असताना रोज छोटे-मोठे अपघात होत असून हा रस्ता आता पैद्दल सुध्दा चालण्या योग्य राहिलेला नाही.
या मोहगांव,तावी,आर्वि,फरीदपुर, येथिल रस्त्यामुळे होणाऱ्या नाहक त्रासाला थांबविण्यासाठी आता तरी लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने डोळे उघडून या रसत्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे, मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे,उपसरपंच सपना बाभळे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता वाघाडे,राजु परचाके,संदिप दातारकर, प्रणाली वांढरे,माजी उपसरपंच कैलास नवघरे,कवडुजी कोटमकर,अनिल धोटे मारोतराव निस्ताने, हरीभाऊ डडमल, नारायण महल्ले अमित शेळके भारत शेळके रुपेश चौधरी रामाजी शिरुडे सतिश सातपुते विलास चौधरी हिरामण शाहरे नारायण नवघरे, ईश्वर निस्ताने, पुरुषोत्तम राऊत, गोविंदा रंदये, अरुण आखुड, यशवंत राऊत, अरविंद राऊत, अंकुश नवघरे, पुरुषोत्तम ओरके सुनिल हाडके,पंढरी शिरुडे,ईश्वर शिरुडे,अतुल कोटमकर, खुशाल शेळके, ,रामचंद्र कोटमकर,उत्तम ढेंगरे, रामभाऊ शिरूर,सुनिल हाडके, आदींसह गावकऱ्यांनी केली आहे.