पुलगांव : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचणगांव बायपास चौक येथील गँरेजमध्ये दुरूस्तीसाठी ऊभा असलेला जाँन्डीअर कंपनिचा ट्रँक्टर कोणीतरी चोरी केला आहे. अशी तक्रार ट्रँक्टर मालक अमोल कोल्हे यांनी पोलीस स्टेशन, पुलगांव येथे दिली असून त्याबाबत चोरीचा गुन्हा नोंद झाला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शैळेश शेळके यांनी गुन्हे प्रगटीकरण चे प्रमुख राजेंद्र हाडके यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाकडे वर्ग केला.
या गुन्ह्यात चोरीस गेलेला ट्रँक्टर व आरोपीबाबत तपासचक्र फिरवून पथकाने अत्यंत शिताफीने गुप्त बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करून चिंचोली जि. अमरावती येथील मनोज अडकणे यास ताब्यात घेवून चोरीसंबधाने सखोल विचारपुस केली असता त्याने ट्रँक्टर चोरी केल्याची कबुली दिली. पुलगांव येथुन रात्री अंधाराचा फायदा घेवून गँरेजच्या बाहेर ऊभा असलेला ट्रँक्टर स्वताच्या ट्रँक्टरला लोखंडी नटबोल्टद्वारा बांधुन अमरावती जिल्ह्यातील झाडगाव शेतशिवारात कोणाच्याही नजरेत येणार नाही. अशा प्रकारे लपवून ठेवला होता. तो ट्रँक्टर पोलीसांनी जप्त केला तसेच गुन्हयात वापरलेला ट्रँक्टर सुद्धा पोलीसांनी ताब्यात घेवून 10 लाख चा मुद्देमाल ताब्यात घेतला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत सोळंखे, उविपोअ. गोकुळसिंग पाटील, पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन, पुलगाव येथील गुन्हे प्रगटीकरण विभागाचे प्रमुख राजेंद्र हाडके, संजय पटले, पंकज टाकोणे, शरद सानप, महादेव सानप, संदिप जाधव,जयदिप जाधव यांनी केली असुन पुढील तपास करीत आहे.
पुलगांव पोलीसांच्या अथक प्रयत्नातून ट्रँक्टर मालकाला ट्रँक्टर मिळाला.