चालकास अटक : दोन दिवसाची कोठडी
आर्वी : विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या कार चालकास अटक करून विदेशी मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई आर्वी ते शिरपूर मार्गावर आर्वी पोलिसांनी केली. पोलिसांनी चालकास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दारू विक्रीचा व्यवसाय करणारा दुसरा कोणी असल्याचा संशय पोलिसांना आल्याने हा माल नेमका कुणाचा, याचा तपास पोलीस घेत आहे. विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी नाकाबंदी केली त्यावेळी एम एच 34 के 3471 क्रमांकाचे वाहन भरधाव येतांना दिसले पोलिसांनी कार थांबवून पाहणी केली असता दारूसाठा मिळून आला. पोलिसांनी दारूसाठा जप्त करीत चालक मनिष प्रशांत डोंगरे (रा. आंबेडकर वार्ड) याला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. ही कारवाई ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात योगेश चाहेर, अंकुश निचत, प्रवीण सदावर्ते, पांडुरंग फुगणार, विलास राठोड, स्वप्नील निकुरे, राहुल देशमुख यांनी केली.