आष्टी अंतोरा :
शहरात सौंदर्यीकरणच्या नावाखाली विद्रुपीकरण करून अपघाताला आमंत्रण देणारे लोखंडी कठडे वाहतूकदारासाठी जीवघेणी ठरत असल्याने सदर रस्त्याच्या कडेला आणि दुभाजकावर लावलेले कठडे काढण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी आष्टी शाखेच्यावतीने केली आहे
कमिशन खाण्याच्या उद्देशाने वाहतुकीची सोय करण्याच्या नावाखाली कठडे लावण्यात आले.संबंधित विभागाने नाहरकत प्रमाणपत्र देऊन या प्रकारे नागरिकांची दिशाभूल करून जीवघेने ठरले आहे. कठडे लावले तेव्हापासून असंख्य किरकोळ अपघातासह गंभीर जखमी होऊन अनेकांचा प्राण गेला आहे. त्यात अनेक तरण्याताठ्या वयातील वाहतूक दाराचा समावेश आहे. यासाठी सदर कठडे काढून नागरिकांना न्याय देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून केली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रवीण गडलिंग, तालुका सचिव अभियोक्ता प्रकाश गायकवाड,उपाध्यक्ष प्रशांत विघ्ने, अविनाश जाधव,प्रशांत बोराळे, सागर माहूरे,शशिकांत बनसोड सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.