आर्वी : – रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, पिपरी – वर्धा येथील
बी. एससी अॅग्रीच्या ‘रावे’. ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत आर्वी तालुक्यातील सावळापूर गावात कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत प्रज्वल शाहू, अभिषेक चायल, प्रतीक पोकळे, निखिल चांडक यांनी ई-पीक पाहणीबाबत थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन दिले.

दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ या मोहिमेंतर्ग महसूल विभागाने पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन निर्मिती केली आहे. मात्र, ई-पीक पाहणीसंदर्भात शेतकरी प्रशिक्षित नाहीत. अनेक शेतकऱ्यांकडे या सोयी-सुविधा नाहीत यासाठी ई-पीक पाहणी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला व शेतकर्यांना माहिती देण्यात आली यासाठी विद्यार्थ्यांना महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बि. के. सोनटक्के , कार्यक्रम अधिकारी पि. एस. खोडके यांचे मार्गदर्शन लाभले.
‘ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे
‘ई-पीक पाहणी’ मुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक,
या नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे,
पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे.
‘ई-पीक पाहणी’ मधील त्रुटी
‘ई-पीक पाहणी’बाबत शेतकऱ्यांना आतापर्यंत योग्य जनजागृती आणि मार्गदर्शन झालेले नाही,
पुढील हंगाम करिता कोणत्याही बँकांकडून पीक कर्ज घेताना अडचणी निर्माण होईल,
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.