हिंगणघाट- आधार फाउंडेशन महिला समिती च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व स्वराज्यजननी जिजामाता यांच्या जयंतीचे औचित्य साधून मकरसंक्रांतीच्या पर्वावर महिला मेळाव्याचे आयोजन व हळदीकुंकू कार्यक्रम बेमिनार पद्धतीने करण्यात आला.

यावर्षी कोरोना ह्या वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर तसेच वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत ऑनलाइन वेबिनार वैचारिक पद्धतीने हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
जानेवारी महिना हा सर्वाइकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणून त्याची सर्वत्र जनजागृती केली जाते,हा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे शारीरिक दृष्ट्या तर स्त्री बळी पडतेच,संपूर्ण कुटुंबही मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचित होते हा कर्करोग आपण पूर्णपणे कसा टाळू शकतो याची लक्षणे व उपाययोजना कोणती याबाबत पीपीटी च्या माध्यमातून उत्तम मार्गदर्शन नागपूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.माधुरी गावंडे यांनी केले कर्करोगाची भयानकता म्हणजे दरवर्षी 122844 स्त्रियांना या रोगाची लागण होते व 67477 स्त्रिया याच्या बळी पडतात.सर्वाइकल कॅन्सर हा कोणालाही होऊ शकतो तर ग्रामीण भागांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळत असून 40शी नंतर साधारत तर 60 व्या वर्षी जास्त प्रमाणात होत असतो.हा कॅन्सर होण्याची कारणे म्हणजे अति धोक्याची वर्तणूक, लवकर विवाह होणे,जास्त प्रमाणात अपत्य होणे, एकापेक्षा जास्त व्यक्तीशी लैंगिक संबंध असणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, आदी मुळे होत असतो. पण हा कॅन्सर अनुवंशिक नाही याची लक्षणे म्हणजे श्वेतपदर,मासिकपाळी मध्ये अतिरक्तस्त्राव होणे,ओटीपोटीत जास्त प्रमाणात दुखणे,सबंधानंतर रक्तस्त्राव होणे ही असून रेडिओथेरपी व किमोथेरपी ह्या आधुनिक पध्दती द्वारे उपचार करता येते पण त्याची खबरदारी म्हणून पॅप टेस्ट,एच.पी. डीएन टेस्ट,प्री कॅन्सरटेस्ट,
कॉलपोस्कोपी,बायोप्सी द्वारे याचे निदान करून तो टाळू शकतो.
वयाच्या पंचविसाव्या वर्षानंतर सर्वांनी पीसीपी टेस्ट करून घ्यावी व मुलींना एच.पी. व्ही.व्हॅक्सीन दयावी व स्वःतहा व मुलींच्या आरोग्याविषयी
अतिशय जागृत व सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी ह्या सेमिनार मधून केले तर आधार फाउंडेशनच्या महिला समिती अशा पद्धतीचे वैचारिक हळदीकुंकू करतात तसेच सामाजिक ,आरोग्यविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन जनजागृती करतात हे अतिशय उत्तम कार्य आहे ह्या बद्दल त्यांनी आधार फाऊंडेशन ची प्रंशशा केली या सेमिनार मध्ये सहभागी सर्व सदस्यांना फीडबॅक फॉर्म देऊन ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यात आले.
या वैचारिक ऑनलाइन सेमिनार चे आयोजन माधुरी विहीरकर यांनी केले. तर सुत्रसंचालन शुभंगिनी नायर हयांनी तर आभार ज्योती धार्मिक नी मानले या सेमिनार च्या यशस्वीतेसाठी माया चाफले, वीरश्री मुडे, अनुराधा मोटवानी, वैशाली लांजेवार, अनिता गुंडे, डॉ. अनिता मनवर ,स्वाती वांदीले, मयूरी देशमुख उमा वाणी, रश्मी धायवटकर,अर्चना मुडे राजश्री विरुळकर, उषा गावंडे, शिल्पा हिंगणे, निलाक्षी बुरीले, डॉ. डिम्पल मोटघरे,उषा घोडमारे, राजेश्री दांडेकर, सुनिता डांगरे,प्रिती कलोडे,वैशाली सायंकार आदीने तसेच आधार फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले .
स्त्रियांनी आपल्या आरोग्याविषयी अतिशय दक्ष व सतर्क रहावे असे आव्हान -डॉ.माधुरी गावंडे ,स्त्रीरोग यांनी केले.