राष्ट्रीय लहुशक्ती संघटना हिंगणघाट तालुक्याच्यावतीने तहसीलदाराना निवेदन
सिंदी (रेल्वे) : नांदेड जिल्ह्यातील गौळ येथील मांतग समाजावर पोलीस प्रशासनाकडून अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रीय लहुशक्ती संघटना हिंगणघाट तालुकाच्या वतीने गुरुवारी 9 सप्टेंबर रोजी हिंगणघाट तहसीलदार यांच्या मार्फत शासणाला देण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रीय लहुशक्ती संघटना जिल्हा उपाध्यक्ष गजानन मुंगले,विदर्भ सरचिटणीस अमोल खंदार,सेलू तालुका अध्यक्ष प्रफुल्ल चिंधुजी कांबळे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष सचिन खंदार, सामाजिक कार्यकर्त
राजूभाऊ खडसे, पवन डोंगरे, राहुल बावणे, अनिकेत वानखडे,किशोर बावणे, नरेश खडसे,मंगला बाई शेंडे, उमाबाई धाडसे, दुर्गाबाई कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.