Saturday, July 27, 2024
Homeवर्धाअठरा वर्षापासून एक गाव एक गणपती

अठरा वर्षापासून एक गाव एक गणपती

आरोग्यदायी उत्सव , गरजू परिवारांना धान्य वाटप मंडळाचे आयोजन

मनिस गांधी
समुद्रपूर : अठरा वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना अमलात आणल्याने येथील बाल गणेश मंडळाला आजवर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.महाराष्ट्र शासनतर्फ लोकमान्य सार्वजनिक गणेशउत्सव अभियानाअंतर्गत बेटी पढाव बेटी बचाव या विषयावर विविध जनजागृती केल्यामुळे जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार एक लाख तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार 25 हजार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते.

धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत असल्याने येथील गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.


१९९७ मध्ये मंडळाची स्थापना करण्यात आली २००४ मध्ये दिवगंत मंत्री आर. आर. पाटील यांनी मांडलेल्या संकल्पनेतून एक गाव एक गणपती ही संकल्पना या मंडळाने अमलात आणली तत्कालीन तहसीलदार सुंकरवार, नायब तहसीलदार श्रीराम गहाणे, ठाणेदार शेट्टी यांनी गावातील मंडळी सोबत बैठक घेतली. एक गाव एक गणपती संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेऊन त्याची धुरा बालगणेश मंडळावर सोपविण्यात आली.हा उत्सव इतर गावाकरिता आदर्शवत ठरत आहे. महाराष्ट्रात गणेश उत्सहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळकडून वारेमाप खर्च होताना दिसते.हा अपव्यय टाळुन येथे एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात सामाजिक कार्यकारिता याचा वापर केला जातो.सामाजिक बांधिलकी ठेवत हे मंडळ लोकमान्य टिळकांची घालून दिलेल्या तत्त्वप्रनालीनुसार वृक्षारोपण, बेटी बचाव आदी विविध सामाजिक उपक्रम व अठरा वर्षापासून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात भर दिला.बाल गणेश उत्सव मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवत व इतरही गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
संपूर्ण जगाला कोरोना महामारी हादरून टाकले कोरोणा विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देश लोकडाऊन असल्यामुळे काही स्थानिकांवर व परप्रांतीयावर उपासमारीची वेळ आली होती.अशा वेळी सामाजिक हित जोपासत गरजू लोकांना जीवनाश्यक वस्तूची किट बाल गणेश मंडळ कडून वाटप करण्यात आल्या या वर्षी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कोरोना संदर्भात बॅनरद्वारे जनजागृती डेंगूची जनजागृती करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहे हे उत्सव साजरा करण्याकरिता तहसीलदार राजु रणविर, ठाणेदार प्रवीण काळे, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, व्यापारी संघाचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, प्राचार्य मेघश्याम ढाकरे, नगरसेवक रवी झाडे, व्यापारी वर्ग, पत्रकार व जनतेची मार्गदर्शन मिळत आहे. या करिता मनीष गांधी, वृषभ राजूरकर, बादल लोहभरे यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे अध्यक्ष सौरभ आत्राम, उपाध्यक्ष अर्जुन झाडे, सचिव राहुल लोकरे, कोषाध्यक्ष आकाश झाडे, मंडळाचे सदस्य अमोल झाडे, उमेश फटिंग, शुभम तळवटकर, हर्षल धोटे, मेहेर झाडे, करण झाडे, अतुल गुजरकर, गजु खडसे, प्रशांत झाडे, सतीश जीपकाटे, मनोहर गभणे, विवेक सायंकार, निर्मल भोयर, प्रमोद भलावी, आकाश कापकर, रोहित मसराम, आकाश ठाकरे, गौरव ठाकरे, पवन फटिंग, हर्षल मुळे, तन्मय झाडे, निलेश बुरडकर या मंडळातील सदस्य सहकार्य करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular