विरुळ आकाजी :
फिर्यादी यांने आपली एक लाल रंगाची बजाज डिस्कव्हर मोटार सायकल पुलगाव कोर्टाचे आवारात लावुन कोर्टाचे काम असल्याने फिर्यादी हा बाबुळगाव जि.यवतमाळ येथे गेला व काम आटपुन परत आला व घरी जाणे करीता मोटर सायकल ठेवलेल्या ठिकाणी पाहणी केली असता फिर्यादीची मोटार सायकल दिसली नाही. तसेच पुलगाव परिसरात मोटार सायकल चा शोध घेतला असता आज पावेतो मिळुन आली नाही कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची एक लाल रंगाची बजाज डिस्कव्हर मोटार सायकल चोरुन नेली अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोद करण्यात आला.
सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक प्रमोद बनबले साहेब यांचे मार्गदर्शनात पो.हवा.रितेश गुजर यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आम्ही, पो.स्टाफ व पंचासमक्ष गुन्ह्यातील आरोपी पंकज ज्ञानेश्वर चचाणे वय 32 वर्ष रा.वाढोणा ता.धामणगाव जि.अमरावती याचे कबुली जबाबावरुन त्याचे ताब्यातुन एक लाल रंगाची बजाज डिस्कव्हर मोटार सायकल क्रमाक MH-32-U-3170 किमंत अंदाजे 20 हजार रु. ,एक काळ्या रंगाची हिरो होन्हा फॅशन मोटार सायकल क्रमाक MH-32-F-7743 किमत 12 हजार रु.असा एकुण जुमला किमंत 32 हजार रु. चा माल मिळुन आल्याने आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले.
सदरची कार्यवाही नरुल हसन पोलीस अधिक्षक जिल्हा वर्धा, डॉ.सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधिक्षक पुलगाव राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात प्रमोद बनबले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव यांचे निर्देशाप्रमाणे सुधिर लडके,रितेश गुजर,चंद्रशेखर चुटे,अमोद जिंदे,ओमप्रकाश तल्लारी, विश्वजीत वानखेडे यांनी केली आहे.