मुळावा : कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या जिवावर बेतुन कर्तव्य बजावले आहे. त्या सर्वांचा कोवीड योद्धा म्हणुन पार्वती ग्रुप ऊमरखेड अंतर्गत पार्वती हेल्थ फाउंन्डेशन च्या वतीने प्रा. आ. केंद्र मुळावा येथे सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या काळात सर्वात महत्वाचे होते ते गावा गावात जाऊन कोरोणा संसर्ग झालेल्या रूग्नांची माहिती काढणे आवश्यक होती. आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी , अधिकारी वर्गाने सातत्याने शोध घेतला. अशा सर्वच मंडळीच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देणारा सन्मान सोहळा पार्वती हेल्थ फाउंडेशन , या सामाजिक संस्थेने केला. यावेळी कोवीड -१९ योध्दा म्हणुन वैद्यकीय अधिकारी, सी. एच. ओ.,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, पोलीस कर्मचारी, महसुल कर्मचारी, पत्रकार बांधव, ग्राम पंचायत कर्मचारी, पोलीस पाटील यांनी जागतिक कोरोना महामारी मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोवीड-१९ योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. नायब तहसीलदार सुधीर देशमुख, पोफाळीचे ठाणेदार भगत यांच्या हस्ते कोविड योद्धांना सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रा .आ .केंद्र मुळावा चे वैद्यकीय अधिकारी व्ही. एस. शिवणकर, पार्वती ग्रुपच्या अध्यक्षा रूपाली शिरडकर, नामदेवराव पतंगे, संदिप दळवे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋषीकेश शिरडकर, अनुज लोखंडे, प्रफुल्ल मुन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन बालाजी शिरडकर यांनी केले. तर अभार एस. एन. मुद्ग्गल यांनी मानले.