Tuesday, December 5, 2023
No menu items!
Home यवतमाळ २४ गौवंशाची पांढरकवडा पोलीस स्टेशन कडून सुटका

२४ गौवंशाची पांढरकवडा पोलीस स्टेशन कडून सुटका


पांढरकवडा नितीन बाराहाते :-
दिनांक २३/१०/२०२१
पो.स्टे. पांढरकवडा हद्दीतून नागपूर-हैद्राबाद रोडने मोठया प्रमाणावर गोवंश तस्करीद्वारे कत्तलीकरिता जात असते. यापुर्वीसुध्दा गोवंश तस्करांवर वारंवार कारवाई करून गोवंश ची सुटका करण्यात आली आहे. तरी सुध्दा गोवंश तस्कर गोवंशची तस्करी करून कत्तलीकरिता हैद्राबाद येथे घेवून जात असतात. त्यामुळे गोवंश तस्करांवर प्रभावी कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिका-यांनी सुचना दिलेल्या आहेत. त्यास अनुसरून गोवंश तस्करी व वाहतूक करणारे वाहनांची माहिती काढण्याकरिता गोपनिय बातमीदार पेरण्यात आले होते.


दिनांक २२/१०/२०२१ रोजी रात्री २०.०० वा. चे सुमारास सपोनि श्री हेमराज कोळी पो.स्टे. पांढरकवडा येथे हजर असतांना पेरण्यात आलेल्या बातमीदारामार्फत खबर मिळाली कि, १०चक्का ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ३३८२ मध्ये गोवंश जातीचे जनावरे अवैध्दरित्या कोंबून कत्तलीकरिता रूंझा-घाटंजी मार्गे हैद्राबाद कडे घेवून जात आहे. अशी माहिती मिळाले वरून सपोनि श्री हेमराज कोळी, सोबत पोउनि संदीप बारिंगे, पोउनि निलेश गायकवाड, पो.ना. २२२८राजू, पो.काॅ. २२७२/निलेश, पो.काॅ. २५२६/सिध्दार्थ असे.२२.१२ वाजता खाजगी वाहनाने रवाना होवून उमरी गांवाजवळ वणी-यवतमाळ रोडवर पेट्रोल पंपाचे समोर उमरी येथील २ पंचांसह सापळा लावून थांबलेले असतांना गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे एक १०चक्का ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ३३८२ हा दिनांक २३/१०/२०२१ चे ००.१५ वा. चे सुमारास उमरी कडून सायखेडा कडे जातांना दिसला. सदर ट्रकला पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता ट्रक चालकाने पोलीसांना पाहून त्याचा ट्रक न थांबवता भरधाव वेगात सायखेडा च्या दिशेने पळवून नेल्याने सदर ट्रकचा पोलीसांनी खासगी वाहनाने पाठलाग सुरू केला. सदर ट्रक चालक त्याचा ट्रक भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेवून चालवित पोलीसांच्या वाहनाला चकवा देत सायखेडा कडे जात होता तरीही पोलीसांनी सदर ट्रकचा पिच्छा सोडला नाही व थरारक पाठलाग सुरूच ठेवला असतांना सायखेडा गांवामध्ये स्पीड ब्रेकर आल्याने सदर ट्रक चालकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचा ट्रक पोलीस पकडतील याबाबत त्याची खात्री झाल्याने त्याने त्याचा ट्रक थांबवून ट्रक सोडून ट्रक चालक पळून गेला व क्लीनर सुध्दा पळून जात असतांना क्लीनरला त्यास पो.स्टाफच्या मदतीने पकडले.

त्यास त्यांचा नांव-पत्ता विचारला असता त्याने त्याचा नांव-पत्ता राहुल राजेश खन्ना, वय २० वर्षे, रा. कामठी, जि. नागपूर असा सांगितला. त्यास पळुन गेलेल्या ट्रक चालकाचा नांव-पत्ता विचारला असता त्याने पळुन गेलेल्या ट्रक चालकाचा नांव-पत्ता इर्शाद ईस्त्राईल खान, वय ३८ वर्षे, रा. बोरी कालान, जि. सिवनी, मध्य प्रदेश असा सांगितला. त्यानंतर सदर ट्रकची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता सदर ट्रकच्या आतमध्ये लहान-मोठे गोवंशीय बैल एकमेकांचे पायाला पाय आखुड दोरीने बांधुन दाटीवाटीने व जखमी अवस्थेत हालचाल करण्याकरिता पुरेशा जागा नसलेल्या अवस्थेत निदर्यतेने व क्रुरपने चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबल्याचे दिसले. वरून पोलीसांनी सदरचे गोवंशिय बैल मुक्त करून पाहणी केली असता एकुण २४ गोवंशिय बैल किं. प्र.१५०००/- रू. एकुण किंमत ३,६०,०००/- रू. मिळुन आले. सदरचे गोवंशिय बैल व १० चक्का ट्रक क्रमांक एम एच ४०वाय ३३८२ किं.अं. १४०००००/- रू. असा एकुण १७६००००/- रू. चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सदरबाबत सविस्तर पंचनामा कार्यवाही करण्यात आली. नमूद ट्रक चालक व क्लिनर विरूध्द अप.क्र. १०४७/२१ कलम २७९, ३४ भादंवि सह कलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) (ट) (झ) प्राण्याना क्रुरतेने/निदर्यतेने वागविण्याचा प्रतिबंधक अधिनियम. १९६० सहकलम ५ (अ)(ब) महा. प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ११९ म.पो.का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो. श्री दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक सो. श्री खंडेराव धारणे, उपविभागिय पोलीस अधिकारी, पांढरकवडा विभाग श्री प्रदीप पाटील सो., पोलीस निरीक्षक श्री जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमराज कोळी, पोउनि संदीप बारिंगे, पोउनि निलेश गायकवाड, पो.ना. २२२८ राजु सुरोशे, पो.काॅ. २२७२निलेश निमकर, पो.काॅ. २५२६सिध्दार्थ कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

Previous article22/10/2021
Next article23/10/2021
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

पांढरकवडा बस स्थानक येथे महिलांचे कायदे विषयक जनजागृती व माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण

पांढरकवडा दि.१८/१०/२०२१आज पांढरकवडा बस स्थानक येथे नगर परिषद पांढरकवडा, बस आगार व्यवस्थापक, तहसील कार्यालय पांढरकवडा, विधी सेवा समिती,तथा वकील संघ आणि सर्व...

कृषि विद्यार्थ्यांनी केले जलशुद्धीकरणाचे प्रात्यक्षिक !

महागाव : तालुक्यातील सवणा येथे कृषी महाविद्यालय उमरखेड व ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ७ व्या सत्रातील कृषी दुत आकाश हुम्बे, शरद...

रिधोरा ग्रा पं सरपंच अपात्र घोषित

वाशिम - मालेगाव तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायतचे सरपंच राधेश्याम पुंडलिक घुगे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केल्याने तालुक्यात एकच...

Most Popular

Recent Comments

Laura Heacock on 14/06/2021
Mike Canty on 27/06/2021
Malcolm Martin on 18/05/2021