यवतमाळ : थंडीच्या संकटात सापडलेल्या प्रवाशांना कडाक्याच्या थंडीत ब्लँकेट वाटून मायेची उब देण्याचा उपक्रम स्वाभिमान कामगार संघटनेने केला आहे.
कोरोनाच्या भयवाहक परिस्थित माणूस माणसापासून दुर गेला. समाजातील उपेक्षीत असलेल्या घटकांना पोट भरणे आणि मुलभुत गरजा पुर्ण करणे याचे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सामाजिक संघटना त्यांना मदत करीत आहे.
विदर्भासह पुर्ण राज्यात थंडीचा गारठा निर्माण झाला आहे . या दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये रस्त्याच्याकडेला धार्मिक स्थळांच्या आडोशांना आसरा घेवुन मनोरुग्ण, दिव्यांग , आपली रात्र या थंडीतून वाचविण्याचा प्रयत्न करित आहे. त्यांचे या कडाक्याच्या थंडीपासून यांचे संरक्षण व्हावे याकरिता स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांची कन्या अलंक्रिता वाघमारे हिने सांताक्लॉजची वेशभुषा साकारुन काल नाताळ ख्रिसमसच्या पर्वावर ब्लँकेटांचे वाटप केले . तसेच
एसटी व खाजगी वाहानांच्या सहाय्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळावी म्हणुन या संघटनेच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निरज वाघमारे , रोशन मस्के , हरिश कामारकर , महेश वाघमारे उपस्थित होते .