यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वासाठी २०२२ पर्यंत घरे’ या योजनेची घोषणा केली आहे. परंतू, शहरातील अनेक गोरगरीब, गरजु या योेजनेपासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील ३५९६ च्यावर नागरिकांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मिळावे म्हणून अर्ज केले आहे. परंतू सदर अर्ज मुंबई मंत्रालयातील गृहविभाकडे धुळखात पडले आहे. सदर प्रस्ताव मंजुर करून नागरिकांना हक्काचे घर द्यावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली आहे. या बाबतचे निवेदनही मुख्यमंत्री कार्यालयात दिले.
सर्व सामान्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वासाठी २०२२ पर्यंत घरे’ या योजनेची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मिळावे म्हणून अर्ज केलेल्या अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. दरम्यान २०१६ मध्ये शहरातील ३५९६ च्यावर नागरिकांनी घरकुल मिळावे म्हणून नगर परिषद प्रशासनाकडे अर्ज केले होते. नगर परिषदने सदर घरकुलाचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयातील गृहविभाकडे पाठविला आहे. मात्र गेल्या चार वर्षापासून घरकुलाचे प्रस्ताव धुळखात पडले आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न हे स्वप्नच तर राहणार नाही ना असा आरोप गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी केला आहे. सदर प्रस्ताव मंजुर करून नागरिकांना हक्काचे घर द्यावे अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी मुख्यमंत्री कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे. जो पर्यंत नागरिकांना हक्काचे घर मिळणार नाही तो पर्यंत आपण प्रयत्न करणार असून, वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही गेडाम यांनी दिला आहे.