विदर्भ कल्याण न्युज नेटवर्क
यवतमाळ : समता सैनिक दलाची स्थापना जिल्हा युनिट च्या वतीने “घर तिथे सैनिक,गाव तिथे सैनिक व विहार तिथे वाचनालय” या अभियानाअंतर्गत येरद येथे शाखा स्थापन करण्यात आली. सदर गावात महिला शाखा व पुरुष शाखा स्थापन करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला विदर्भ निमंत्रक मार्शल हेमंत गायकवाड, जिल्हा प्रशिक्षक मार्शल विवेक कांबळे, मार्शल नयना लाभणे, मार्शल भूपेंद्र गजभिये, मार्शल संदेश गोटे, मार्शल गजभिये यांनी मार्गदर्शन केले. महिला शाखा प्रमुख म्हणून मार्शल प्रिया मेश्राम यांची तर पुरुष युनिट करिता शाखा संघटक म्हणून मार्शल प्रेम गजभिये यांची निवड करण्यात आली.