दारव्हा : वन्यप्राणी शेतातील शेतपिके ऊध्वस्त करतात.वन्यप्राण्यांपासुन शेतपिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने उपाययोजना करणे अपेक्षीत आहे. वर्षानुवर्षे शेतकरी वनविभागास निवेदने देतात.परंतु वनविभागाकडून शेतकऱ्यांचे विनंती अर्जास केराची टोपली दाखविण्यात येते.

वनविभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्यावर्षी वन्यप्राण्यांपासुन शेतीसंरक्षणाकरीता एक नवी शक्कल उपयोगात आणली आहे.शेतकऱ्यांनी शेतीचे कंपाऊंड ला रंगीत साड्या बांधल्या आहेत. तेथे साड्या बांधण्यात आल्या आहेत त्या शेतात वन्यप्राणी शिरकाव करीत नाही असे शेतकरी सांगतात. हा प्रयोग तालुक्याअंतर्गत अनेक गावचे शेतकरी करीत असुन त्यांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाल्याने आनंदीत आहेत.