पांढरकवडा : वणी – यवतमाळ या मार्गावरील करंजी येथे रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन धारकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने करंजी येथे राष्टीय महामार्गावर आज बुधवारी रस्ता रोको आंदोलन केले.

करंजी येथील रोडवर खड्डे पडले असून, खड्डे बुजविण्यात यावे या मागणीचे निवेदन २३ नोव्हेंबर रोजी संबंधित अधिका-यांना दिले होते. परंतू एक महिना होवून संबंधित अधिका-यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज बुधवारी करंजी येथे चंद्रपूर यवतमाळ रोड वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे तिरुपती कंदकुरीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पांढरकवडा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधिका-यांनी मध्यस्ती केली. याप्रसंगी महामार्गाच्या अधिका-यांनी रस्त्याचे काम लवकरच करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात संजय आंबटकर, संजय कुंडलवार, बाबूलाल चव्हाण, नारायण वासेकर, भीमराव आत्राम, किशोर आडे, नागसेन भगत, कृष्णा गजबे, आनंद साठे, अतुल चोपडा, संतोष आडे, धनराज दहिगुडे, अंकित पेंढारकर, तेजस चोपडा, संतोष पवार, संतोष चव्हाण, रुपेश राठोड, सागर मुडे, जीवन राठोड, अमोल जाधव, रामेश्वर चव्हाण यांच्यासह करंजी येथील नागरिक सहभागी झाले होते.