वणी : मानवतेचे पुजारी, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण देणारे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांच्या 121 जयंती निमित्त येथील साने गुरुजी चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

येथील नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा वणी, मित्र मंडळ व संस्कार भारती वणीच्या विद्यमाने हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात त्यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या प्रसंगी नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी मार्गदर्शन केले. गुरुजींनी दिलेल्या शिकवणीची आज समाजाला सर्वाधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सागर मुने यांनी साने गुरुजींचे ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत सादर केले. नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार, विदर्भ साहित्य संघाचे वणी शाखेचे सचिव प्रा. अभिजित अणे, मित्र मंडळाचे सचिव राजाभाऊ पाथ्रडकर, संस्कार भारतीचे सागर मुने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीपक नवले, अर्जुन उरकुडे, प्रमोद सप्रे, विशाल काळे, शरद सरमोकदम, महादेव तिरणकार, उद्धव बेसरकर, प्रसन्न संदलवार, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार वामन गेडाम इत्यादी नागरिक उपस्थित होते.