वणी : अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद च्या वणी शाखे कडून 24 डिसेंबर ला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला हारार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अनुराग काठेड हे होते.
यावेळी ग्राहक संरक्षण कायदा 2020 विषयी विधी सल्लागार ऍड. सिंग यांनी माहिती दिली. सल्लागार अरुण कावडकर, जिल्हा उपाध्यक्ष कुंतलेश्वर तुरविले, सल्लागार आनंद शोभणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यकारिणी सदस्य युवा विचारवंत सृजन गौरकार यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष लोकसेवक अमित उपाध्ये यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे प्रवक्ते सागर मुने यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था शहर अध्यक्ष परितोष पानट, सचिव श्री गोविंद काळे यांनी केली. यावेळी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष संध्या अवताडे, मदनराव अवताडे, तालुकाध्यक्ष राहूल खारकर, प्रसिद्धी प्रमुख वैभव मेहता, शहर कार्यकारिणी सदस्य प्रमोद खुरसाने हजर होते.