वाशिम – मालेगाव तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायतचे सरपंच राधेश्याम पुंडलिक घुगे यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.राधेश्याम घुगे 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेमधून निवडून आले होते.
2019 ह्या वर्षांमध्ये मार्च, एप्रिल, मे, जुलै, नोव्हेम्बर व डिसेंम्बर ह्या महिन्याच्या मासिक सभा तसेच ह्याच वर्षांमध्ये ग्रामसभा घेतल्या नसल्याने त्यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप सावळे ह्यांनी जिल्हाधिकारी वाशिम ह्यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 7 व कलम 36 अंतर्गत प्रकरण क्र बि व्हि पी1958/एस आर /रिधोरा-26/2019-20 दाखल केले होते
त्या प्रकरणामध्ये वेळोवेळी सूनावण्या होऊन सरपंच राधेश्याम पुंडलिक घुगे हे दोषी आढळून आल्याने मा जिल्हाधिकारी वाशिम ह्यांनी दि 28/01/2021रोजीच्या आदेशाने अर्जदाराचा अर्ज मंजूर करून सरपंच राधेश्याम पुंडलिक घुगे ह्यांना रिधोरा ग्रा पं सरपंच तथा सदस्य पदावरून अपात्र घोषित केले आहे. अर्जदार संदीप सावळे ह्यांच्या वतीने ऍड राकेश चंदनांनी ह्यांनी कामकाज पाहले