घाटंजी : राष्ट्रीय किसान दिनानिमित्त पिंपरी (इंझाळा) येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने कंपोस्ट खत निर्मिती कार्यशाळा व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषि अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी घाटंजी तालुका कृषि अधिकारी मृणाल साठे हे होते. मार्गदर्शक अमोल जिनेवाड समुह सहाय्यक, प्रमुख अथीती कृषी सहाय्यक के. बी. बेदरकर उपस्थित होते. सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक त्र्यंबक तोटावार, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा डॉ. प्रिती तोटावार, नेफडो घाटंजी ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा सोनल कर्लावार, उपाध्यक्षा जया अडलवार, सचिव सपना फसलवार,संघटक मंजूषा पेंचलवार, सदस्या सुनीता चन्नावार ह्या होत्या. रासायनिक शेतीमुळे जमिनीचे होणारे नुकसान लक्षात घेता कंपोस्ट खत निर्मितीबाबत नेफडॊ तर्फे राबवण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कृषी अधिकाऱ्यांनी कौतुक केले. याप्रसंगी शेतकरी बांधव संजय पेंचलवार यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात घाटंजी येथील कृषि अधिकारी मृणाल साठे, के बी बेदरकर,अमोल जिनेवाड यांनी सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमता चाचणी, पारंपारिक पिकांऐवजी पर्यायी पिके वापरून उत्पादनक्षमता वाढीबाबत तसेच शासनाच्या विविध योजनांविषयी माहीती दिली.यावेळी चर्चा सत्रात शेतकरीबांधव अडलवार,नाखले, डहाके,बोलचेट्टिवार, फसलवार, चन्नावार, कर्लावार यांनी उपस्थित बांधवांच्या समस्यांचे निराकरण केले.