यवतमाळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे च्या वर्धापण दिना निमित्त ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन समतादुत प्रकाश गाढवे यांनी केले. विशेष मार्गदर्शक राहुल कऱ्हाळे (यवतमाळ जिल्हा प्रकल्प अधिकारी) उपस्थित होते. मार्गदर्शक रूपेश वानखडे कळंब तालुका समतादुत यांनी बार्टीची स्थापना ,कार्य,उद्दिष्टे याविषयी माहिती दिली. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डि.पी. तेलगोटे हे होते. याप्रसगी प्रकाश गाढवे यांनी बार्टीच्या विविध योजनांची माहिती दिली. मनोज गाढवे ( अधिक्षक ) यानी विचार वक्त केले. या प्रंसगी सर्व यवतमाळ जिल्हा समतादुतांची उपस्थिती होती. आभार मोहिनी तिघरकार यांनी मानले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणुकीत शंकरराव राठोड विजयी
दारव्हा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पदी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते शंकरराव राठोड विजयी झाले. त्यांना २५ मते प्राप्त झाले असुन त्यांचे प्रतिस्पर्धी दत्ता राहणे यांना ११ मते व पंढरीनाथ सिंहे यांना ८ मते मिळाली आहेत. त्यांचे संचालक पदी निवडीबद्दल स्थानिक सर्वपक्षीयांकडुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.